

Description
सुंदर साडीचा परफेक्ट लुक... योग्य पेटिकोटपासूनच सुरू होतो!
आजही अनेक जणी प्रत्येक साडीसाठी एकच पेटिकोट वापरतात. त्यामुळे साडीचा Fall, Fitting आणि संपूर्ण Look अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. पण जर तुम्हाला प्रत्येक साडीसाठी योग्य पेटिकोट तयार करता आला, तर तुमच्या शिवणकामाची गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास दोन्ही वाढतील.
या पेटिकोट मास्टरी वर्कशॉप मध्ये आपण प्रत्यक्ष उदाहरणांसह बाजारात सर्वाधिक वापरले जाणारे पेटिकोट शिकणार आहोत.
✅ रेग्युलर कॉटन पेटिकोट
✅ सिल्क पेटीकोट (नेट, टिश्यू व ऑर्गन्झा साड्यांसाठी योग्य)
✅ फिश कट (मरमेड) पेटीकोट
✅ कॅन-कॅन स्कर्ट (ब्रायडल आणि लेहेंगा स्टाईल साडी ड्रेपिंगसाठी)
यासोबतच:
✔ अचूक माप घेण्याची पद्धत
✔ प्रोफेशनल ड्राफ्टिंग
✔ परफेक्ट कटिंग
✔ टप्प्याटप्प्याने शिवण्याची संपूर्ण पद्धत
✔ स्वच्छ व प्रोफेशनल फिनिशिंग
✔ मार्केट टिप्स आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन
हे वर्कशॉप फक्त पेटिकोट शिवायला शिकवणार नाही, तर प्रोफेशनल दर्जाचे काम कसे करायचे हे देखील शिकवेल.
जर तुम्ही बुटीक ओनर, टेलर, फॅशन डिझाईनचे विद्यार्थी/विद्यार्थिनी असाल,गृहिणी किंवा शिवणकाम शिकण्याची आवड असलेली व्यक्ती असाल, तर हे वर्कशॉप तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
योग्य कौशल्य आत्मसात केल्यावर तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या बुटीक साठी अधिक दर्जेदार पेटिकोट तयार करू शकता. हे कौशल्य तुमच्या कामाची गुणवत्ता वाढवण्यासोबतच नवीन ऑर्डर्स आणि कमाईच्या संधीही निर्माण करू शकते.
आजच सहभागी व्हा आणि पेटिकोट स्टिचिंगमध्ये आत्मविश्वासाने प्राविण्य मिळवा!
Content

01) पेटिकोट बद्दल माहिती

