

Description
या कोर्समध्ये आपण क्लोज नेक (ज्वेल नेक) ब्लाउज चे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत.
या ब्लाउजचा विशेष प्रकार म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड क्लोज असलेला सेकंड टाईप ब्लाउज, ज्यामध्ये शोल्डर टू वेस्ट (Shoulder to Waist) फिटिंग असलेला ब्लाउज शिकवला जाणार आहे. हा प्रकार सध्या खूप ट्रेंडमध्ये असून बॉडीला परफेक्ट फिट आणि प्रोफेशनल लूक देतो.
कोर्समध्ये तुम्हाला अगदी बेसिक पासून प्रत्येक स्टेप सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे, ज्यामुळे बिगिनर व्यक्तीही सहज शिकू शकते.
✂️ या कोर्समध्ये काय शिकाल?
✔️ क्लोज नेक / ज्वेल नेक ब्लाउजचे मोजमाप (Measurements)
✔️ पेपरवर आणि कापडावर अचूक कटिंग पद्धत
✔️ शोल्डर टू वेस्ट (Shoulder to Waist) सेकंड टाईप ब्लाउज कटिंग व स्टिचिंग
✔️ फ्रंट व बॅक क्लोज ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग प्रोसेस
✔️ फ्रंट ओपनिंग करण्याची योग्य पद्धत
✔️ बॅक साईडला जॅकेट झिप लावण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत
✔️ बॅक नेकसाठी विविध आकर्षक डिझाईन रेफरन्स
✔️ प्रोफेशनल फिनिशिंग टिप्स
🎯 हा कोर्स कोणासाठी आहे?
✔️ बिगिनर (नवीन शिकणारे)
✔️ बुटीक चालवणाऱ्या महिला
✔️ ब्लाउज डिझायनिंगमध्ये स्किल वाढवू इच्छिणारे
✔️ घरबसल्या कमाई सुरू करू इच्छिणारे
💡 कोर्सचे फायदे:
✨ ट्रेंडिंग डिझाईन शिकण्याची संधी
✨ घरबसल्या शिकता येणारा कोर्स
✨ परफेक्ट फिटिंग टेक्निक शिकता येतील
✨ स्वतःसाठी आणि कस्टमर साठी ब्लाउज तयार करता येतील
Content

